‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता वाढणार आहे काय? – वागळे

Mumbai – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी 20 सदस्य राज्य मंत्रिमंडळाच्या खात्यांचे वाटप केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याकडे वन मत्स्य व्यवसाय आणि सांस्कृतिक कार्य ही खाती देण्यात आली. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी लगेचच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा फर्मान काढला असून या फर्मानाची सध्या मोठी चर्चा होताना दिसत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक  मोठा निर्णय घेतला. शासकीय कार्यालयांमध्ये आता हॅलो ऐवजी वंदे मातरम असं म्हणण्याचा निर्णय  मुनगंटीवार यांनी घेतला. यानंतर  विरोधकांनी या निर्णयाला  जोरदार  विरोध केल्याचे चित्र समोर आले आहे.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयावरून आता पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांनी   सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे सरकारला टोला लगावला आहे. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता वाढणार आहे  काय? असा खोचक सवाल  निखिल वागळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना केला आहे.