Ramdas Athawale | चवदार तळे सत्याग्रहाच्या 97व्या वर्धापन दिनी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने उद्या महाडच्या क्रांतिस्तंभाजवळ जाहिर अभिवादन सभा

मुंबई (Ramdas Athawale) | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दि.20मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळे येथे केलेल्या क्रांतिकारी ऐतिहासिक सत्याग्रहाच्या 97व्या वर्धापनदिनी उद्या दि. 20 मार्च 2024 रोजी महाडच्या क्रांतिभुमीत चवदार तळ्याजवळील क्रांतिस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्हाच्या वतीने जाहिर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेस रिपांइचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले (Ramdas Athawale) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले आणि रिपांइचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड उपस्थित राहणार आहेत.तसेच रिपाइंचे नवनियुक्त कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे आणि रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे उपस्थित राहणार आहेत.तसेच सुमित मोरे,सुशांत सकपाळ,केशव हाटे.प्रमोद महाडिक,एम.डी कांबळे,सुदास मोरे,महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे,लक्ष्मण जाधव,प्रभाकर जाधव,नितेश हाटे,अशोक मोहिते,सिध्दार्थ सकपाळ,मनिश मोरे,शेट्टे,नरेश साळवी,शंकर मोरे,जयराज जाधव,प्रमोद शिर्के,नवनाथ लोकरे,भिवा शिंदे,धनराज पवार आदि रिपाइं कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहा निमित्त महाड क्रांतिस्तंभा जवळ जाहिर अभिवादन सभा आयोजित करण्याची परंपरा 50वर्षापूर्वि भारतीय दलित पँथरच्या माध्यमातुन ना.रामदास आठवले यांनी तत्कालीन दलित पँथरचे रायगड जिल्हातील जेष्ठ पँथर दिवंगत एम.एस.जाधव(तुडील) यांनी सुरु केली.तेव्हा पासून रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइं तर्फे महाड क्रांतीस्तंभा जवळ जाहिर अभिवादन सभेचे आयोजन केले जाते अशी माहिती रिपाइं चे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

चवदार तळे सत्याग्रहाच्या 97व्या वर्धापन दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक सायंकाळी महाड चवदार तळ्यापासून काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड याच्या अध्यक्षतेत जाहिर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका