संजय राऊत यांच्यावर कारवाई का झाली ? सोमय्यांनी सांगितले नेमके कारण  

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्ट्राचाराच्या (Corruption) विरोधात ईडीने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन, प्रॉपर्टी आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना आधीच लक्षात आले होते त्यांनी म्हणून त्यांनी 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते असे किरीट म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार असल्याचे म्हटले आहेत. मागील दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. यांना वाटतं पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कारवाई होणार त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी प्रॉपर्टी जप्त केली आहे असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले आहेत.