एका षटकात 29 धावा देऊनही अमित मिश्राने राहुल चहरचे कौतुक केले 

मुंबई – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग पाचव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल 2022 च्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जने 12 धावांनी पराभूत केले. या सामन्यात पंजाबचा गोलंदाज राहुल चहरने (Rahul chahar)  पहिल्याच षटकात २९ धावा  दिल्या. मुंबई इंडियन्सचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने (Dewald brevis) चहरच्या एका षटकात 4 षटकार आणि एक चौकार लगावला. मात्र असे असतानाही अमित मिश्राने (Amit Mishra) चहरचे कौतुक केले आहे.

अमितने चहरचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. अमित मिश्राने राहुल चहरचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्यात त्याने लिहिले की, ”राहुल चहरच्या स्तुतीसाठी मी हे ट्विट करत आहे. त्याने पहिल्या षटकात 29 धावा दिल्या. यानंतर पुढील तीन षटकात केवळ १५ धावा दिल्या गेल्या. त्याने पोलार्ड आणि सूर्या (सूर्यकुमार यादव) सारख्या दिग्गजांसमोर गोलंदाजी केली.

पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान राहुलला 9वे षटक देण्यात आले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टिळक वर्माने एक धाव घेत ब्रेव्हिसला स्ट्राईक दिला. दुसऱ्या चेंडूवर ब्रेव्हिसने चौकार मारला. तर यानंतर सलग चार षटकार मारले गेले. अशा प्रकारे या षटकात एकूण 29 धावा झाल्या. पण यानंतर राहुल चहरने पुढच्या 3 षटकात केवळ 15 धावा दिल्या.