उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून निवडणूक आयोग बरखास्त करू शकतात; देसाईंची खोचक टीका 

मुंबई- केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देत उद्धव ठाकरे यांना ४४० व्होल्टचा झटका दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला बरखास्त करण्याची मोठी मागणी केली आहे.

दरम्यान, या मागणीबाबत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे मतोश्रीवर बसून निवडणूक आयोग बरखास्त करू शकतात. त्यांनी मातोश्रीवर बसून एक आदेश काढाला तर निवडणूक आगोय बरखास्त होऊ शकतो, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंची ही मागणी हास्यास्पद आहे. घटनेने निवडणूक आयोगाची रचना केली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेने निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते. घटनात्मक पदसुद्धा बरखास्त करा, असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. उद्धव ठाकरेंसारख्या अनुभवी नेत्याने अशाप्रकारे लोकशाहीला मारक असलेलं वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार आहे , अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.