Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

Gangster Sharad Mohol Murder – कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Killed) याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे.

दरम्यान, अशातच या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. पुण्यात काल एक घटना घडली होती. पण पोलिसांनी ताबोडतोब जे कुणी दोषी होते त्यापैकी अनेकांना पकडण्यात आलंय. पोलिसांनी दोन-तीन तासांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याची सविस्तर माहिती दिलीये. पोलिसांचा पुढचा तपास सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. काल पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या झाली, त्यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्यात आली. त्याची कारणं ही समोर आलेली आहेत. पुण्यातील सर्व घडामोडींकडे पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष आहे. संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी त्याबद्दल बोलणं उचित नाही, मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल, असं आश्वसन अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ