महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; बापाने आपल्या 3 वर्षाच्या मुलासोबत केले असे काही…

Yavatmal Crime News: माणुसकीला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्रातील यवतमाळमधून समोर आली आहे. आर्णी तालुक्यातील एका तीन वर्षाच्या मुलाला त्याच्याच वडिलांनी तेलंगणातील आदिलाबाद येथे दारूसाठी विकले. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटकही केली आहे.

याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली. पती-पत्नीचे पटत नव्हते, असे सांगितले जात आहे. यामुळे दोघेही गेल्या महिन्यापासून वेगळे राहत होते. पीडित मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. पुढे दारूसाठी लागणाऱ्या पैशांसाठी पित्याने आपल्या मुलाला विकले. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडिलांसह कोपरा गावातील अन्य एका व्यक्तीला अटक केली.

आणखी दोन आरोपींना अटक, दोघांचा शोध सुरू आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे श्रावण दादाराव देवकर (वय 32, रा. मुलाचे वडील), चंद्रभान देवकर (वय 65 वर्षे), तर कैलास लक्ष्मण गायकवाड आणि बाल्या गोडांबे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ