मनोज बाजपेयी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, आई गीता देवी यांचे निधन

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची आई गीता देवी यांचे गुरुवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेत्याच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला असून त्यांनी सकाळी 8:30 वाजता मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

गीता देवी यांना 20 दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी देखील त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र अखेर गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गीता देवी यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मनोजने वडिलांना देखील गमावले आहे .