Sharad Mohol | शरद मोहोळचा मारेकरी मुन्ना पोळेकरचं वय ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Gangster Sharad Mohol murder – कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Killed) याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे.

दरम्यान, यामधील मुख्य आरोपी असलेला मुन्ना कोळेकर याचं आणि सोबतच्या आरोपींचे वय पाहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (वय 20 रा. सुतारदरा), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती) विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड) नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव) अशी आरोपींची नावे आणि वय आहेत.

दरम्यान, या आरोपींसोबतच दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उडान (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी या वकिलांची नावं आहेत. दरम्यान, अवघ्या 20 व्या वर्षी हा गुन्हा करणारा साहिल चर्चेचा विषय बनला आहे. कमी वयात मोठा गुन्हेगार त्याला व्हायचे होते का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ