Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात भलताच सूत्रधार, आतापर्यंतची सर्वात खळबळजनक अटक!

Vitthal Shelar : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या (Sharad Mohol Killed) झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवीन नवीन महिती समोर येत आहे. यानुसार मुळशी तालुक्यामधीलच गुंड विठ्ठल शेलार हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं सांगितले जात आहे.

पोलिसांनी पनवेलमध्ये रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह दहा जणांना अटक केली आहे. शरद मोहोळचा साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर याने ही हत्या केल्यानंतर तोच मुख्य आरोपी असावा असा पुणे पोलिसांचा अंदाज होता. मात्र, त्याच्या अटकेनंतर चौकशीतून जी माहिती समोर आली त्या आधारे पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना अटक केली. हेच दोघे शरद मोहोळच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

शरद मोहोळ याचे वर्चस्व मुळशी व परिसरात वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन त्यांच्यात कुरुबुरी सुरु होत्या. काही महिन्यांपूर्वी मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार ही केला होता. विठ्ठल शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका