‘तुमची कॅटेगरी काय? सहकाऱ्यांना विचारा ते तुम्हाला खासगीत..’, शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना खोचक सवाल

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या कालच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं होतं. यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखीलराष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी कर्नाटकमध्ये बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी चालू असल्याचं म्हंटलं होतं. या संपूर्ण घटनांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

“पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी आहे की डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार”, असा खोचक टोला शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.