The Kerala Storyला विरोध वाढला; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीकडून चित्रपटावर बंदी

The Kerala Story: The Kerala Story विरोधात सुरू असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटाला मोठा पाठिंबा मिळत आहे, मात्र पश्चिम बंगालमध्ये चित्रपटाविरोधात सुरू असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन राज्यामध्ये थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी तमिळनाडू राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्येही चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटावरील बंदी हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.