संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्या ‘त्या’ तरुणांना शरद पवार गटाचा पाठींबा? सरकारकडे केली त्यांना सोडून देण्याची मागणी

Vikas Lawande – १३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा दलांनी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर UAPA च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली. या महिलेचं नाव नीलम आणि मुलाचं नाव अमोल शिंदे (Amol Shinde) असल्याचं समजतं आहे. या सगळ्या आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका बाजूला या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अचानक या गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याचे समर्थन सुरु केले आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे . कारण राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याबाबत ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, मा. नरेंद्र मोदी काल संसदेत ज्या बेरोजगार तरुणांनी आंदोलन केलं त्यांचा मार्ग चुकीचा असला तरी त्यांची भावना व प्रश्न आपण समजून घ्यावेत,आपल्या अपयशी सरकारने त्यांचेकडून माफीपत्र घेऊन त्यांना मुक्त करावे. आपण खोटी आश्वासने दिल्या बद्दल देशाची माफी मागावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://x.com/VikasLawande1/status/1735182097315430762?s=20

महत्वाच्या बातम्या-