‘शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणूनच प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवलाय’

सांगली –  या राज्यामध्ये जातीयवादाला खतपाणी ( Fertilizer for racism ) हे खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी ( Pawar ) घातलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षात प्रत्येक जातीचा नेता तयार केला आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot)  यांनी सांगलीत बोलताना केली आहे.

ज्याने त्याने आपापली जात सांभाळायची, त्याच्या बदल्यात कितीही भ्रष्टाचार ( Corruption ) करायचा. तुम्हाला आमदार करतो, खासदार करतो, मंत्री करतो पण त्याच्या बदल्यात तुम्ही तुमची जात सांभाळा.. आणि पवारसाहेब कसे तारणहार आहेत, एवढंच त्या जातीमध्ये जाऊन सांगा… गेली ४० वर्ष या महाराष्ट्रात हाच धंदा सुरु आहे. पण आता महाराष्ट्राच्या जनतेला सारं काही कळायला लागलं आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले.

जातीभेद वाढवा, जातीजातीत तणाव निर्माण करा. वेगवेगळ्या समाजामध्ये दुही निर्माण करुन त्यांना फोडा, झोडा ही राष्ट्रवादीची निती जुनी आहे.असं ते म्हणाले. सदाभाऊ खोत यांना यावेळी आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) आक्षेपार्ह भाषणाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी  शिवराळ भाषा वापरली. त्यांनी मिटकरी यांची तुलना तमाशाच्या फडावरच्या नाच्यासोबत केली.