शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं – गोपीचंद पडळकर

नाशिक – कमरेखाली बोलायची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी वाल्यांनाच हे विचारा.. शरद पवार आणि रोहित पवार (Sharad Pawar and Rohit Pawar) यांचा चौडीत (chaundi) यांचा संबंध काय? महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं. अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी नाशिकमध्ये केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, कोणाचे वय किती झाले? याच्याशी मला घेणं देणं नाही.. वय झालं तरी घरी बसा.. प्रमुख म्हणून मिरवताच ना? म्हणून शरद पवारांचे वय झालं आहे, त्यांनी घरी बसावं. यापुढे जाऊन पडळकर म्हणाले की, जे सरकारचे करते धरते आहे, त्यांच्यावर टिका झाली तर वाईट वाटून घेऊ नका.

गोपीचंद पडळकर शेवटी म्हणाले की, शरद पवार नावाला नाही तर प्रवृत्तीला आमचा विरोध असून पूर्वीचा काळ वेगळा होता, तुम्हाला घाबरायचे पण आता नाही. यापुढे जात पडळकर म्हणाले की, पडळकरची मी औलाद आहे, म्हणूनच शरद पवारला नडतोय, असे गंभीर विधानही त्यांनी यावेळी केले.