मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत, अशाप्रकारे होत असलेली बदनामी आम्ही मुळीच सहन करणार नाही – पटोले

मुंबई – भाजपच्या नेत्यांनी मोहम्मद पैंगबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्याने वादाला तोंड फुटलंय. अरबच्या दुतावासाने (Embassy of Arabia) भारताला यासंदर्भात माहितील दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी (BJP spokesperson Nupur Sharma fired) झाली आहे. नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

या दरम्यान आणखी एका वादाला तोंड फुटलंय. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो (Photo of Prime Minister Narendra Modi on garbage cans) लावण्यात आले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतं. अनेकांनी यासंदर्भात ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, अरब देशातील कचराकुंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे कृत्य अतिशय संतापजनक आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. मोदीजी आमचे विरोधक जरी असले आणि त्यांची विचारसरणी आम्हाला पटत जरी नसली तरी लोकशाही पद्धतीने आम्ही त्यांचा विरोध करू ! विचारांची लढाई ही विचारांनीच लढाईला हवी. मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अशाप्रकारे होत असलेली बदनामी आम्ही मुळीच सहन करणार नाही !असं त्यांनी म्हटले आहे.