Sharad Pawar | महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज

मुंबई (Sharad Pawar) : नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यंनी केला आहे.

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या अतिविशाल सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते ते पुढे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल असा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.

शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पिडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी