Manohar Joshi Passed Away | निष्ठावंत शिवसैनिक मनोहर जोशींचे निधन, उद्धव ठाकरे बुलढाणा दौरा अर्धवट सोडून माघारी परतले

Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. सकाळी 11 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा रुपारेल महाविद्यालयाजवळील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Manohar Joshi Passed Away) करण्यात येणार आहेत.

मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. मनोहर जोशींच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पूर्व नियोजीत दौऱ्यामुळे सध्या शेगाव तालुक्यात आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार उद्धव ठाकरे यांचे आजचे बुलढाणा जिल्हा दौऱ्याचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आजच्या नियोजित तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे शेगाव वरुन संभाजीनगर विमानतळ आणि तिथून मुंबईला येतील. त्यानंतर ते मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील, अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार