शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं – महादेव जानकर

सांगली : सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.मात्र आज माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. जानकर यांनी शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावे ही आपली इच्छा असल्याचं वक्तव्य केलंय.

महादेव जानकर म्हणाले की, एसटीच्या सवलती पवार साहेबांनीच दिल्या. आम्ही प्रयत्न केले. धनगर समाजासाठी एसटीच्या 13 योजना मी बनवल्या. 1 हजार कोटी रुपये दिले. मात्र अजून 1 हजार कोटी तुम्ही दिले. त्यामुळे एसटी समाजातील मुले भविष्यात आएएस, आयपीएस होतील. बाप हा बाप असतो आणि नेता हा नेता असतो. मी ही तीन चार आमदार केले.

पहिलं आरक्षण शाहूंनी दिलं आणि होळकरांच्या घरी मुलगी देण्यात आलीय. जयंत पाटील तुम्ही आम्ही पाहुणे होऊ शकतो. शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे मी माझी इच्छा आहे. मोदी आणि तुमचं रिलेशन चांगलं आहे, थोडा धक्का द्या. महाराष्ट्रात आपण दोघं असल्यावर रान हाणून नेऊ. माझी पार्टी भविष्यात राष्ट्रीय पार्टी होईल आणि मी खासदार होऊ शकेल, असंही वक्तव्य जानकर यांनी केलंय.