… म्हणून शरद पवारांनी दारातूनच घेतलं दगडूशेठ हलवाई गपणतीचं दर्शन

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे आज चर्चेत आहेत. शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी भिडे वाडयाची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले.

शरद पवार या ठिकाणी आले तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांकडून शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या समर्थकांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र पवार यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. यामागील कारणाचा खुलासा राष्ट्रवादीनेच केलाय.

पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण (Non_veg)  केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.