भिडे-एकबोटेंवर आरोप करणाऱ्या शरद पवारांनी नेहमीप्रमाणे मारली पलटी, म्हणाले…

पुणे – अहमदनगर रस्त्यावर एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणापाठीमागे वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे (Milind Ekbote of ‘Samast Hindu Aghadi’ and Sambhaji Bhide of Shiv Pratishthan Sanghatana) असल्याचा आरोप घटना घडल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President MP Sharad Pawar) यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अनेक वेळा केला. मात्र, प्रत्यक्षात सदर हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल (Former Justice J. N. Patel) यांच्या चौकशी आयोगासमोर (Commission of Inquiry) पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करत कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेबाबत मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा अजेंडा किंवा उद्देश याबाबत माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घूमजाव केले.

शरद पवार यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी आयोगासमोर पहिलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्याच प्रतिज्ञापत्राला जोड म्हणून पवारांनी 11 एप्रिल रोजी दुसरं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. दुर्देवी घटनेमागे कोणताही राजकीय अजेंडा किंवा हेतूविषयी माझे कुणावरही आरोप नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. माझा सार्वजनिक जीवनातील एकंदरीत अनुभव आणि माहितीच्या आधारे आयोगाला मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पवारांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

अॅड. प्रदीप गावडे ( Adv. Pradeep Gawde ) यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली होती. येत्या ५ मे रोजी शरद पवार यांना जबाब नोंदवला जाणार आहे. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे समजते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा शरद पवार यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार होती. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी आयोगाने त्यांना बोलावलं आहे.