Lokasabha Election | निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

Lokasabha Election | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या (Lokasabha Election) कै. ह. तू. थोरवे प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १६२ बी व विद्या निकेतन १९ चंद्रभागनगर कात्रज या शाळेतील शिक्षकांना निवडणूक कामकाजाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश बजावण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी वारंवार संधी देऊनही त्यांना नियुक्त केलेल्या भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आपले निवडणूक कर्तव्य पार पाडण्यात अक्षम्य दुर्लक्ष, कुचराई, दिरंगाई केल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० कलम ३२ अन्वये निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यापुढेही निवडणूक कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह कडक कारवाई करण्यात येईल, असेही आसवले यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला