IND vs ENG | रोहित शर्माची कॅप्टन्सी खेळी, सात महिन्यांनंतर कसोटीत झळकावले शतक

IND vs ENG : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) राजकोटमध्ये कॅप्टन्सी खेळी खेळताना शतक झळकावले. त्याने 157 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एका वेळी भारतीय संघाने 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर रोहितने रवींद्र जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 204 धावांची विक्रमी भागीदारी करत भारताला मजबूत (IND vs ENG) स्थितीत आणले. पहिल्या सत्रात तीन विकेट्स गमावल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने एकही विकेट गमावली नाही. चहापानाच्या वेळी रोहित 97 धावा करून नाबाद होता.

रोहितने सात महिन्यांनंतर कसोटी शतक झळकावले
तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच रोहितने आपले शतक पूर्ण केले. मात्र, तो तिसऱ्या सत्रात 196 चेंडूंत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 131 धावा करून बाद झाला. मार्क वुडने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या शतकी खेळीनंतर भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो 15व्या स्थानावर आला आहे. या फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर 51 शतके आहेत.

रोहितने जुलै 2023 नंतर कसोटीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याचे यापूर्वीचे शतक जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते. त्यानंतर विंडसर पार्कवर त्याने 103 धावांची खेळी खेळली.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole