“तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुणा-कुणाची चा**”, उद्धव ठाकरेंवर टीका करताना नरेश म्हस्केंची जीभ घसरली

mumbai- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे-पवार यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लाचार, लाळघोटे, फडतूस म्हणत त्यांच्यावर टीका केली. यानंतर या टीकेला उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची जीभ घसरली आहे.

“तुम्ही फडणवीस यांना जर लाळघोटे म्हणता, मग तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुणा-कुणाची चाटली”, अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

“कुणाला लाळघोटे म्हणता? तुम्हाला मुख्यमंत्री होण्याकरता आम्ही शिवसेना-भाजप म्हणून एकत्र निवडून आलो. लोकांसमोर नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला. शिवसेना-भाजप युती म्हणून मतं मागतिली आणि आपण त्यांना लाळघोटे म्हणता. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणा कुणाची चाटलीत मुख्यमंत्री होण्यासाठी, याचं सुद्ध उत्तर तुम्ही दिलं पाहिजे”, असं म्हणत म्हस्के यांनी ठाकरेंवर जहरी टीका केली.

“तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे आभार मानायला हवेत. कारण यापूर्वी तुम्ही फक्त मी आणि माझे कुटुंब, मी आणि माझे घर,मी आणि माझं परिवार करतत होता. या दोघांमुळे ( शिंदे-फडणवीस) हे दोघे काम करतायेत. त्यामुळे तुम्ही रस्त्यावर उतरला आहेत.नाहीतर तुम्ही कुटुंबाच्या बाहेर जात नव्हतात. मी आणि माझं घर आणि माझी तिच जबाबदारी, अशा शब्दात म्हस्केंनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले.