“बरे झाले देवा उर्वशी येथे नाही”; रिषभ पंतच्या महिला चाहतीच्या कृतीवर भडकली उर्वशी रौतेला!

भारतीय यष्टीरक्षक आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत कार अपघातानंतर विश्रांती घेत आहे. तो सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२३ च्या हंगामात खेळत नाहीय. मात्र अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याला पंतने हजेरी लावली होती. त्याने स्टँडमधून आपल्या दिल्ली संघाला चीयर केले. पंतचे सामना पाहतानाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले.

मात्र जिथे पंतचे नाव येते, तिथे बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या नावाचीही चर्चा होते. दिल्ली विरुद्ध गुजरात संघातील सामन्यातही याचा प्रत्यय आला. पंतच्या एका महिला चाहतीने सामन्यादरम्यान उर्वशीला ट्रोल करण्यासाठी असे काही केले, ज्यामुळे अभिनेत्री तिच्यावर संतापली आहे.

त्याचे झाले असे की, सामन्यादरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पंतची एक महिला फॅन हातात पोस्टर घेऊन दिसत आहे. तिने पोस्टरमध्ये लिहिले आहे की, “बरे झाले देवा उर्वशी येथे नाही.” उर्वशीचे पोस्टर सोशल मीडियावर पाहताच व्हायरल झाले. या व्हायरल पोस्टरवर अभिनेत्रीकडूनही उत्तर आले आहे. इन्स्टाग्रामवर हे पोस्टर पोस्ट करत उर्वशीने “का?” असे विचारले आहे. चाहते या पोस्टरवरुन उर्वशीला ट्रोल करत आहेत.