Shirur LokSabha 2024 | “यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार

पुणे : शिरूर लोकसभा (Shirur LokSabha 2024) मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji adhalrao patil ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोल्हे यांनी पराभव केला होता. मात्र यावेळी आढळराव पाटलांसोबत अजित पवार असल्याने शिरूरच्या लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा (Shirur LokSabha 2024) मतदारसंघात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल शिरूर लोकसभेसाठी महायुतीची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी महायुतीच्या सर्व नेत्यांनी आढळराव पाटलांच्या पाठीमागे उभे राहण्याचे चंद्रकांत पाटलांनी आवाहन केले. त्याआधी पेठ पंचायत समिती येथे आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.

यावेळी महायुतीच्या मार्गदर्शनाखाली समस्त कार्यकर्त्यांनी आढळरावांच्या विजयाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसून आले. तसेच जनतेच्या आशिर्वादाने व समस्त कार्यकर्त्यांच्या साथीने यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका