Ram Kadam | ‘भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत..’, राम कदम यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, ज्यामुळे शिवसेना उबाठा गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक झाले आहेत. “उद्धव ठाकरेंवर टीका करायला तुझी औकाद काय आहे? आया बहिणींना उचलून आणण्याची भाषा करणारा माणूस, प्रत्येक आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा खट्टा मीठा चित्रपटातील अन्सारी आहेस” अशा शब्दात शरद कोळी यांनी राम कदम यांच्यावर टीका केली आहे.

‘भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडला आहेस’
“राम कदम (Ram Kadam) तू तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस. उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही. मनसेतून हाकलून दिल्यानंतर भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडला आहेस. राम कदम तू हिशोबात रहा, अन्यथा तुझा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त केला जाईल” असे शब्द शरद कोळी यांनी वापरले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका