मुंबईने कॅप्टन्सीवरुन काढल्यानंतर रोहित आणि रितिकाचे पडले तोंड, फोटो पाहून चाहतेही भावूक!

Mumbai Indians Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहित शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे. खरंतर, रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Rohit Sharma Wife Ritika Sajdeh) मुंबईतील एका शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही तीच शाळा आहे जिथे त्यांची मुलगी समायरा सध्या शिकत आहे. रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवल्यानंतर काही तासांतच हे फोटो घेतले गेले आहे.

रोहित आणि रितिका इतर मुलांच्या पालकांसोबत बसलेले दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनुसार, समायराने या सोहळ्यादरम्यान स्टेजवर परफॉर्म देखील केला होता. मात्र, कार्यक्रमात रोहित आणि रितिका यांचे उदास चेहरे पाहून चाहते काळजीत पडले. अनेक चाहत्यांनी हे फोटो पाहून रोहितच्या चेहऱ्यावरील निराशा त्याला मुंबईच्या कर्णधारपदावरुन काढल्यामुळे असल्याचे म्हटले आहे.

रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे
रोहित 2013 पासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्यानंतर रिकी पाँटिंगने मोसमाच्या मध्यावर कर्णधारपद सोडले. सीझनमध्ये रोहितने कमान हाती घेताच मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत चेन्नईचा पराभव करून आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. यानंतर संघाने मागे वळून पाहिले नाही. मुंबईने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जिंकले. आपल्या कार्यकाळात, रोहितने 158 आयपीएल सामन्यांमध्ये 87 विजय मिळवले, जे या कालावधीतील कोणत्याही कर्णधाराने सर्वाधिक सामना विजय आहेत. या यादीत धोनी 82 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबईने 2022मध्ये हार्दिकला सोडले
2015 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी अनकॅप्ड भारतीय खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकला 2022 मध्ये फ्रँचायझीने रिलीज केले. त्यानंतर गुजरात टायटन्सने त्याला कर्णधार म्हणून करारबद्ध केले. या अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघाने त्या वर्षी विजेतेपद पटकावले आणि 2023 मध्ये उपविजेते ठरले.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!