बुमराहचा बॉलने नाही तर बॅटने विश्वविक्रम, इंग्लंडविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस 

 स्टुअर्ट ब्रॉडला आज बुमराहने धु धु धुतलं 

 एजबॅस्टन   –  एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने जोरदार फलंदाजी केली. त्याने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा दिल्या. तथापि, यात नो बॉल आणि एक्स्ट्रा मधून धावांचाही समावेश आहे.

यासह कर्णधार बुमराहने 46 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. ब्रॉडच्या षटकात 35 धावा करणाऱ्या बुमराहने पदार्पण कर्णधार म्हणून 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. याआधी 1976 मध्ये कर्णधार म्हणून 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना बिशन बेदीने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

इंग्लंडचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात बुमराहने 35 धावा दिल्या. ब्रॉडच्या षटकात बुमराहने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी ब्रॉडने वाईडचा चौकारही दिला. यासह ब्रॉडच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.