शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांना मिळणार थेट मोदींच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी ?

Mumbai – राज्यात सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. यातच आता मंत्रिपद नेमके कुणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही नेत्यांना डच्चू देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काही नेत्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, गजानन कीर्तीकर, श्रीरंग बारणे, भावना गवळी या नेत्यांची नावे मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत.