शिवसेनेचे दोन्ही वाघ विजयी; अहिर-पाडवी यांचा दिमाखदार विजय 

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल (Result of Legislative Council Election) समोर आला असून उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadase), उमा खापरे (Uma Khapre),श्रीकांत भारतीय (Shreekant Bhartiy), राम शिंदे (Ram Shinde), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar),प्रवीण दरेकर (Praveen Darekar), सचिन अहिर (Sachin Ahir),हे  विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी २६ मतांचा कोटा पूर्ण केला.

शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही २६ मतांचा कोटा पूर्ण केला. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे (Ramraje Shinde) यांचे एक मत बाद ठरुनही त्यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या शिवसेनेनं (Shivsena) विधान परिषद निवडणुकीमध्ये परतफेड केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अचूक प्लॅनिंग करून शिवसेनेनं विजयाचा नारळ फोडला आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) विजयी झाले आहे.