Shivajirao Adhalrao Patil | कोल्हे फक्त नारळ फोडण्यापुरते खासदार झाले,आढळराव पाटलांचा खोचक टोला

Shivajirao Adhalrao Patil | महायुतीचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या ५ वर्षांत आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचताना विरोधी उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. शिरूरच्या खासदारपदी असताना कोल्हेंनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. नागरिकशास्त्राचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे गल्लीत फिरायचं नसतं, असं सांगत लोकांची दिशाभूल केली. पण मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण असतो, असा टोला आढळराव पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंना मारला आहे.

नुकत्याच एका पत्रकार परिषदेत संवाद साधताना आढळराव पाटील म्हणाले, ‘लोकांकडून विकासकामांचा जास्त आग्रह असतो. डॉ. अमोल कोल्हे रंगमंचावरील ॲक्टर आहेत, त्यांनी प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत मतदारसंघांमध्ये एकही काम उभे केले नाही. मी इंद्रायणी मेडिसीटी उभी करणार, हा मुद्दा घेऊन कोल्हे प्रचार करत आहेत. पण पाच वर्षात या प्रकल्पाचा कागद पण तयार झाला नाही. आता जे प्रकल्प झाले आहेत, ते सगळे माझ्या कारकिर्दीत सुरू झाले. यामुळे कोल्हे फक्त नारळ फोडण्यापुरते खासदार झाले आहेत,’ असा खोचक टोमणाही यावेळी आढळराव पाटलांनी लगावला.

पुढे अमोल कोल्हे खोटा प्रचार करत असल्याचा आरोप करताना आढळराव म्हणाले, ‘त्यांनी पत्रकात ४५ हजार कोटींची विकासकामं आणल्याचा बनावट दावा केला आहे. पण त्यांची सर्व कामं प्रस्थापित, अंतिम टप्प्यात अशीच अर्धवट आहेत. त्यांच्याकडून खोटा प्रचार केला जातो की, मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. पण संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून लोकांची कामं होत नाहीत. गावात एखाद्या शेतकऱ्याचा डीपी जळाला तर ती कामं होतात का? नाही, कारण तुम्ही मतदारसंघातच उपलब्ध नाहीत’, असेही आढळराव पाटलांनी म्हटले.

‘त्यांनी नागरिकशास्त्राचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे गल्लीत फिरायचं नसतं, असं सांगत लोकांची दिशाभूल केली. पण मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण असतो. तुम्ही ५ वर्षांच्या कारकिर्दीतील १८२५ दिवस जर दिल्लीत असाल तर फक्त १६१ दिवसचं तुमची लोकसभेत उपस्थिती असाल. मग उरलेले सोळाशे – सतरावे दिवस तुम्ही मतदारसंघातही नाही आणि दिल्लीतही नाही. हा सगळा खोटा प्रचार चालू आहे’, असेही आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) शेवटी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत