Bhiwandi LokSabha 2024 | सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी; मविआत बंडखोरीचे संकेत

Bhiwandi LokSabha 2024 | लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. त्यातच काही नव्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळं प्रस्थापित आणि विद्यमान खासदारपदी असणाऱ्या कैक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पक्षात बंड करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, भिवंडी लोकसभा (Bhiwandi LokSabha 2024) मतदारसंघात मविआत बंडखोरीचे संकेत मिळताहेत.. शरद पवारांकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश  म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून वरिष्ठांच्या आदेशानुसार, मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा अपक्ष लढणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिलाय.. तर हा मविआच्या घरातील प्रश्न असून वरिष्ठांच्या आणि पदाधिका-यांच्या चर्चेतून यावर तोडगा काढू अशी प्रतिक्रीया सुरेश म्हात्रेंनी दिलीये.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत