Meat Ban : गणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, ‘या’ महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाची होतेय सर्वत्र चर्चा

Bangalore : गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi 2022) बंगळुरू महानगरपालिकेने (bangalore municipal corporation) घेतलेल्या एका निर्णयाची सध्या मोठी चर्चा होताना दिसत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरु महानगरपालिका हद्दीत मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे.

31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचं आगमन होतं. त्यामुळे या दिवशी मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी कन्नड भाषेत या संबंधीचा आदेश बंगळुरु महानगरपालिकेने बजावला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.

दरम्यान, असे प्रतिबंध यापूर्वी देखील लागू करण्यात आले होते. अनेक सणांच्या वेळी मांस विक्रीवर बंदी घातली जाते.यामध्ये कोणतीही नवीन बाब नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते एस.प्रकाश यांनी दिली आहे . यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी, बंगळुरु महापालिकेने कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. तसंच बुद्ध पौर्णिमा आणि राम नवमीला देखील बंगळुरु महानगरपालिकेने मांस विक्रीवर बंदी घातली होती.