लोक काय विचार करतील याचा विचार करू नका; शोएब मलिकचा सल्ला

Shoaib Malik On Third Marriage | पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) 18 जानेवारी रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) तिसरे लग्न केले. लग्नानंतर दोन दिवसांनी या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सनासोबत लग्नाच्या घोषणेनंतर शोएबने त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झाला घटस्फोट (Sania Mirza) दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सना जावेदसोबतच्या लग्नानंतर शोएब मलिकला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या सर्व प्रकारानंतर शोएबने आता मौन तोडले आहे. शॅडो प्रॉडक्शन पॉडकास्टवर बोलत असताना शोएब म्हणतो, तुमचे मन तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही केले पाहिजे. लोक काय विचार करतील याचा विचार करू नये.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झाने 2010 मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगा इझान देखील आहे. दरम्यान, मलिकच्या तिसऱ्या लग्नावर त्याच्या कुटुंबातील सदस्यही खूश नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. मात्र, त्याच्या धाकट्या भावाने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल