पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? लैंगिक शोषण झालेल्या तरुणीचे गंभीर आरोप

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्याविरोधात 17 फेब्रुवारी 2022 रोजी 24 वर्षीय तरुणीने पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पिडीत तरुणी म्हणाली, कुचिकने आपल्याला लग्नाचे आमिष देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात मी संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी मदत केली नाही. इंजेक्शन देऊन मला बेशुद्धावस्थेत माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. महिला आयोग, पुणे पोलिसांकडून मला मदत मिळाली नाही. म्हणून मला चित्रा वाघ यांच्याकडे जावं लागलं.

मला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांना जबाब महत्वाचा आहे, माझे आरोग्य महत्वाचे नाही. ते चुकीचं वागत आहेत. ज्याप्रमाणे कुचिक यांच्या मुलीने अर्ज केला त्याप्रमाणे माझ्या मागणीकडे पण पहावं. माझी मागणी आहे की कुचिक यांची नार्को टेस्ट करावी, मी टेस्टला तयार आहे असं पीडित तरुणीने म्हटले आहे.