Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अमरावतीतून निवडणूक लढणार; नवनीत राणांसमोर कडवे आव्हान?

Prakash Ambedkar | अमरावती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचे केंद्रस्थान बनले आहे. भाजपाने अमरावतीतून नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीतून बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांना पराभूत करण्याचे ठरवले आहे. तसेच प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीदेखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हं आहेत.

आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याचा टोला त्यांनी हाणला. अमरावती हा विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. पण त्याचा विकास रखडला आहे. त्यामुळेच आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल