Ajit Pawar | जमीन आपल्या नावावर केली म्हणून वयस्करांना घराबाहेर काढायचे नसते; सख्खा भावाचा अजित पवारांवर हल्लाबोल

अजित पवार (Ajit Pawar) हे बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि महायुतीसोबत हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. या बंडखोरीनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात आमनेसामने असणार आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आता बारामती लोकसभेच्या लढतीसाठी रणांगणात उतरले आहे. दरम्यान अजित पवार (Srinivas Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दादांमा फटकारले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना सुनावले आहे.

काटेवाडीतून अजित पवारांवर (Ajit Pawar) हल्ला चढवताना श्रीनिवास पाटील म्हणाले, साहेबांचे (शरद पवार) आपल्यावर खूप उपकार आहेत. काटेवाडीतील गावकरी म्हणून तुम्हाला हे सर्व माहीत आहे. त्यांचे ८३ वय झाले म्हणून त्यांची साथ सोडणे मला पटले नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. आपणास दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार आहे, यामुळे सोडणे चुकीचे आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना सुनावले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

ज्यांना पदे मिळाली ती फक्त साहेबांमुळे मिळाली. त्याच साहेबांना आपण म्हणतो, आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा. हे माझ्या मनाला पटत नाही. औषधांची एक्सप्रायरी डेट असते. काही नात्यांची एक्सप्रायरी डेट असते. कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जावे मला पटत नाही, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी