‘खलिस्तान्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी’

पटियाला- शिवसेनेने (shivsena) पंजाबमधील(panjab) पटियाला (Patiala) येथे खलिस्तानविरोधी मोर्चा (Anti-Khalistan rally) काढला. यादरम्यान परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आणि अनेक शीख संघटना (Sikh Association) आणि हिंदू कार्यकर्ते (Hindu activists) आमनेसामने आले. परिस्थिती अशी बनली की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. या वेळी दोन्ही बाजूंनी तुफानी दगडफेकही झाली.

पटियाला येथे शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला (Shiv Sena’s Punjab working president Harish Singh) यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून (Arya Samaj Chowk) मोर्चा निघाला. खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, पतियाळा येथील आर्य समाज चौकात हा गोंधळ झाला. शिवसैनिकांनी खलिस्तानी विरोधी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरु झाली.

यावेळी दोन्ही गटांचा विरोध वाढल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती अनियंत्रित झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली आणि गोळीबारही झाला, यामध्ये एका गटाचा नेता जखमी झाला. या संपूर्ण प्रकरणानंतर आता हरीश सिंगला यांची पक्षातून पक्षविरोधी कारवायांचा हवाला देत हकालपट्टी करण्यात आली आहे.

यावरून आता भाजप नेते सुनील देवधर (BJP leader Sunil Deodhar) यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पंजाबमध्ये देशद्रोही खलिस्तान्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेना नेत्याला नव्या जनाबसेनेच्या नेतृत्वाने पक्षातून हाकलून लावले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी व देशभक्त शिवसैनिकाला जागा नाही. देशद्रोही तुकडे-तुकडे गॅंगचे नवे मेम्बर: शिवसेना! असं देवधर यांनी म्हटले आहे.