… म्हणून आम्ही औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले; वारीस पठाण यांची सारवासारव 

मुंबई  – काल एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले. दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे.

याबाबत एमआयएमचे नेते वारिस पठाण (MIM leader Waris Pathan) यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अकबरुद्दीन औवेसी हे आज एका शाळेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी आज आम्ही सर्व दर्ग्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. एका कबरीचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचं दर्शन घेतलं.