सोनमची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून फेकला; मोहम्मद अन्सारी अटकेत

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पोलिसांना समुद्रकिनाऱ्यावर गोणीत भरलेल्या अवस्थेत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला होता. NEET परीक्षेची तयारी करणारी 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लाच्या ( Sonam Shukla Murder Case ) हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी ( Mohammad Ansari Arrested ) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने घरी बोलावून सोनमचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सोनम 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिकवणीला (extra Classes) जाण्यासाठी तिच्या घरातून निघाली होती. त्यानंतर ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह वर्सोवा भागात समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला होता. ती गोरेगाव पश्चिम भागातील प्रेमनगर भागात वास्तव्यास होती. सोनम शिकवणीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेली. पण ती शिकवणीला गेली नाही. रात्री 9 च्या सुमारास ती एका मैत्रिणीच्या व मित्राच्या घरी गेली होती. सोनम रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी तिला फोन केला. त्यावेळी तिने लवकरच घरी येणार असल्याचे, सोनमने वडिलांना सांगितलं. पण रात्री 11.30 वाजले तरी सोनम घरी आली नसल्याने वडिलांनी तिला पुन्हा फोन केला पण तो बंद लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोनम ही बेकरी मालक असलेल्या मोहम्मद अन्सारीच्या घरी गेली. त्यावेळी मोहम्मदाचे आई-वडील घरी नव्हते. सोनम आणि आरोपी अन्सारी हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्यात यावेळी वाद झाले. अन्सारीने सोनमला घरी बोलावून तारेच्या वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर हात पाय बांधून तिचा मृतदेह एका पोत्यात भरून मालाड पश्चिमच्या नाल्यात टाकून दिले होते.  वडिलांनी आरोपीचा उल्लेख केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने सोनमच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.