सोनिया गांधी पोहोचल्या ईडी कार्यालयात; काँग्रेस नेते ठिकठिकाणी उतरले रस्त्यावर  

नवी दिल्ली-   नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गुरुवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांची चौकशी करत आहे. नॅशनलहेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी सोनिया गांधी ईडी (ED) कार्यालयात पोहोचल्या आहेत. ईडीच्या चौकशीदरम्यान सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) देखील उपस्थित राहणार आहेत. एजन्सीने वैद्यकीय कारणास्तव परवानगी दिली आहे.

सोनिया गांधी यांना पाठींबा व्यक्त करत  कॉंग्रेस नेत्यांकडून दिल्लीसह (Delhi) देशभरात निषेध करण्यात येत आहे. सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी सकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली, ज्यामध्ये पुढील रणनीती ठरविण्यात आली. यादरम्यानराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि खासदार दिल्लीत उपस्थित आहेत.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे सरचिटणीसजयराम रमेश यांनी ट्विट केले की,मोदी-शाह जोडीने आमच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध ज्या प्रकारे राजकीय सूडबुद्धी सुरू ठेवली आहे, त्याविरोधात काँग्रेस पक्ष उद्या आपल्या नेत्या सोनियागांधींसोबत सामूहिक एकता व्यक्त करत देशभरात निषेध व्यक्त करेल.