Sourav Ganguly: आता सौरव गांगुली उद्योगक्षेत्रात आजमावणार हात, बंगालमध्ये काढणार कारखाना

Sourav Ganguly Investment in Industry: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav ganguly) आता उद्योग क्षेत्रात हात आजमावणार आहे. तो आता स्टीलच्या उद्योगात गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. सौरवने शुक्रवारी बंगालमधील शालबनी येथे जिंदाल यांच्या मोकळ्या जागेवर कारखाना सुरू करण्याची घोषणा केली.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्पेन दौऱ्यावर असलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या शिष्टमंडळात सौरव गांगुलीने स्पेनमध्ये ही घोषणा केली. एका बंगाली वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव म्हणाला की, मी शालबनी कारखान्यात 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात यातून सुमारे सहा हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचे काम सहा महिन्यांत सुरू होईल, असे सौरवने सांगितले. या कारखान्यासाठी बंगाल सरकार शालबनी येथे जिंदाल यांची जमीन देणार आहे. तेथे अद्याप कारखाना नाही.

महत्त्वाच्या बातम्या-