गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर झळकणार, सबसे कातीलचा घुंगरु सिनेमा ‘या’ दिवशी होतोय रिलीज

Gautami Patil Movie: लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लवकरच गौतमी पाटीलचा घुंगरु हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: गौतमीने याबद्दल माहिती दिली आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाउंडेशन दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गौतमीने आपल्या चित्रपटाबद्दल सांगितले.

दोन महिन्यांनी माझा घुंगरु सिनेमा येणार आहे. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असं मी आवाहन करते आहे. तसंच एक गाणंही येणार आहे. मात्र ते काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही ते सरप्राईज असणार आहे असंही गौतमी पाटीलने यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-