मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत 28 मे रोजी पुण्यात राज्यव्यापी बैठक

पुणे – मातंग समाजावर वारंवार होणा-या जिवघेणे व जुलमी अत्याचाराला थांबविण्याकरीता  मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व नेत्यांच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन 28 मे रोजी  पुण्यात करण्यात आले आहे  या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .या बैठीकाला माजी मंत्री रमेश बागवे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फुले ,शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभुमी महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मातंग समाजावर सध्याच्या काळात वारंवार अन्यास, अत्याचार जुलमी व जिवघेणे हल्ले त्याच बरोबर माता भगिनींवर शाररीक व मानसिक अत्याचार होत असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची कास धरून फुले, शाहू. अण्णाभा साठे यांच्या विचाराने महाराष्ट्र प्रामाणिकपणे व कष्टमय जिवन जगत असलेल्या मातम समाजावर मागील काळात व सदयस्थितीत अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. यामध्ये मातंग समाजाचे प्रेत जाळू न देणे, महिला भगिनींवर शाररीक व मानसिक अत्याचार वाढत आहेत. अनेक तरुणाचे नाहक बळी घेतले जात आहेत.

यामध्ये सदयस्थितीतील औरंगबादची मनोज आव्हाड यांना बांधून अमानूसप जिवेमारण्याची घटना अशा अनेक घटना छत्रपती शिवाजी महाराजा सारखे अत्याचा-याच्य विरोधात सर्वांचे रक्षण करणा-या राजांच्या या महाराष्ट्रात घडत आहेत. यामुळे आजह मातंग समाजाला स्वातंत्र मिळाले आहे की नाही असे संपुर्ण मातंग समाजाला वाटू लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजा सारखे अन्याया विरोधात लढणारे राजे या महाराष्ट्राचे ख राज्यकर्ते होते. तथापी सध्याचे राज्यकर्ते मातंग समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराल खतपाणी घालत आहेत असेच वाटू लागले.

वरील अन्याय अत्याचार यापुढे आपणच थांबवायचे असा निर्धार मातंग समाजाने केला असून हे जुलमी अन्याय अत्याचार कशा प्रकारे थांबवायचे यावर विचार विनिमय करण्याकरीता मांतग एकता आंदोलनाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. गृहराज्य मंत्री  रमेश बागवे यांच्या अध्यक्षते खाली व कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनामध्ये राज्याच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिका-यांची दिशा दर्शक महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

स्थळ – जनरल अरुणकुमार वैदय स्टेडियम भवानी पेठ पुणे ४२ वेळ व दिनांक – २८/०५/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता. अशी माहिती महाराष्ट्र राज्य समन्वयक विठ्ठल थोरात ,अरुण गायकवाड ,संजय साठे यांनी दिली आहे .