वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

अकोला – अकोला येथे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहत (Police colony) परिसरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संजय सोळंके (Sanjay Solanke) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येस ठाणेदार, पोलीस दलातील बाबू जबाबदार असल्याचे आत्महत्या केलेल्या संजय सोळंके यांनी सुसाईड नोटमध्ये (suicide note) लिहीलं आहे.

आज सोमवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास खदान पोलीस कर्मचाऱ्यांना लिंबाच्या झाडाला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे (Khadan Police Station) प्रभारी ठाणेदार विजय नाफडे (Vijay Nafade) हे करीत आहेत. या घटनेनं अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.