कोल्हापुरात सभेवर दगडफेक, चित्रा वाघ यांच्या आरोपामुळे खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.भाजपनं कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ  या काल प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.  त्यांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुक्तसैनिक वसाहत इथं रात्री सभा सुरू पार पडली. सभा सुरू असताना एका बाजूने व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.  चित्रा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली आहे.

वाह रे बहाद्दरांनो…, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.