Sunetra Pawar: “जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”, राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत

Sunetra Pawar: "जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत

Sunetra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना काल प्रचारादरम्यान वेगळाच अनुभव आला. काल सुनेत्रा पवार या प्रचारासाठी राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीवरच प्रचंड उत्साहाने गावकऱ्यांनी स्वागत केले. गावच्या वेशीपासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या. गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी केलेले औक्षण अशा अफाट उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं.

सर्व ग्रामस्थांनी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले. आपुलकीने सन्मान केला. निर्धारपूर्वक प्रचंड मताधिक्याने विजयाची ग्वाही दिली. त्याबद्दल या साऱ्या साऱ्यांचे सुनेत्रा पवार यांनी मनापासून आभार मानले. तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रचिती आजच्या राजगड तालुका दौऱ्यातही सुनेत्रा पवार यांना आली. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसंपर्कासोबत राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन. हा माझा शब्द. देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी गावकऱ्यांना दिला.

या दौऱ्याची सांगता वडगाव झांजेमध्ये झाली ती अशा भक्कम, जल्लोषी, उत्स्फूर्त प्रतिसादाने झाली. राजगड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष दामगुडे यांनी प्रास्ताविकात देशहित जपत विकासाच्या पाठीशी सारा राजगड तालुका घड्याळाच्या पाठीशी एकवटल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब देशमाने, संदीप खुटवड, विकास नलावडे, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, शैला दारवटकर, संगीता जेधे स्थानिक ग्रामस्थ सत्यवान दामगुडे,दिनकर झांजे, किसन झांजे, पांडुरंग झांजे, शंकरराव दामगुडे, बापूसाहेब आलगुडे, तानाजी झांजे, किरण पानसरे, दशरथ झांजे, माऊली झांजे, काशिनाथ झांजे, अलका झांजे, हर्षदा झांजे, रुपाली झांजे, ज्योती दामगुडे, तानाजी झांजे, विठ्ठल झांजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Dinesh Karthik | दिनेश कार्तिकच्या फॉर्ममुळे विकेटकीपर्सचा तणाव वाढला! या ३ खेळाडूंवर टांगती तलवार

विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही-अपूर्व आढळराव पाटील

उपमुख्यमंत्री पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; नीलम गोऱ्हे यांचा सहभाग

Previous Post
Dinesh Karthik | दिनेश कार्तिकच्या फॉर्ममुळे विकेटकीपर्सचा तणाव वाढला! या ३ खेळाडूंवर टांगती तलवार

Dinesh Karthik | दिनेश कार्तिकच्या फॉर्ममुळे विकेटकीपर्सचा तणाव वाढला! या ३ खेळाडूंवर टांगती तलवार

Next Post
Ishan Kishan | 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान

Ishan Kishan | ‘ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर…’, इशान किशनचं विधान

Related Posts
परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अमृता देवगावकर यांची नियुक्ती

परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अमृता देवगावकर यांची नियुक्ती

पुणे | परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अमृता देवगावकर ( Amruta Devgaonkar) यांची नियुक्ती…
Read More
Sunil Shelke | ...अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Sharad Pawar on Sunil Shelke  | मला ‘शरद पवार‘ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर…
Read More
Ajit Pawar | अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं - हेमंत पाटील

Ajit Pawar | अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं – हेमंत पाटील

Ajit Pawar : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला डावलण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) करत आहेत. राज्यातील…
Read More