Ishan Kishan | ‘ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर…’, इशान किशनचं विधान

Ishan Kishan | वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा आणखी एक सामना तसेच कॅप्टन हार्दिक पांड्या याची चाहत्यांकडून हुटींग, अशी दृश्ये पुन्हा पाहायला मिळाली. स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच ही कहाणी सुरू आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिकला मुंबईचा नवीन कर्णधार बनवल्याचा रग अजूनही चाहत्यांमध्ये आहे. गुरुवारी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हार्दिकच्या समर्थनार्थ आला आणि चाहत्यांना हार्दिकला त्रास देणे थांबवण्यास सांगितले. सामन्यानंतर, मुंबईचा विकेटकीपर फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हादेखील पत्रकार परिषदेत याबद्दल बोलला.

हार्दिक तक्रार करणार नाही-
मला माहित आहे की, हार्दिक याचा आनंद घेत असेल. मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. तो आव्हानांसाठी तयार आहे कारण तुम्ही चाहत्यांची तक्रार करू शकत नाही. ते त्यांच्या अपेक्षा घेऊन येतील, त्यांची मते मांडतील. पण त्याचवेळी हार्दिक पांड्या कसा विचार करतो हे मला माहीत आहे. त्याला आव्हाने आवडतात. हार्दिक हा अशा प्रकारचा माणूस नाही जो बाहेर येईल आणि चाहत्यांना बडबड थांबवण्यास सांगेल, कारण त्याच्या स्वतःच्या अपेक्षा आणि मानसिकता आहे. मात्र, चाहत्यांना लवकरच नव्या कर्णधारावर प्रेम वाटू लागेल, असं इशान किशनने सांगितले.

ड्रेसिंग रुममध्ये हार्दिकच्या हूटिंगबाबत…
येत्या सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करेल आणि लोक त्याला पुन्हा पसंत करू लागतील. कारण तुम्ही चांगले काम करत असाल तर लोक तुमची मेहनत ओळखतील. आमचे चाहते असे आहेत. ड्रेसिंग रुममध्ये हार्दिकच्या हूटिंगबाबत कोणतीही चर्चा होत नाही. कारण ड्रेसिंग रुममधील प्रत्येकजण कर्णधाराला पूर्ण पाठिंबा देत आहे. मी त्याच्यासाठी आनंदी आहे की हार्दिक या परिस्थितीतही कामगिरी करण्यास उत्सुक आहे. तो मैदानात उतरत आहे आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो आहे, असं कौतुकही इशान किशनने यावेळी केलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते