Ajit Pawar | उपमुख्यमंत्री पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; नीलम गोऱ्हे यांचा सहभाग

पुणे | आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेद्वारे प्रचाराचा आढावा घेतला. या बैठकीला शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह माजी आमदार शरद सोनवणे, सुधीर कुरुमकर, बाळासाहेब चांदेरे, सुधीर जेव्हरे, पूजा रावेतकर, सारिका पवार, निलेश गिरमे यांसह अन्य शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बारामती, शिरूर, मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्नांची निरसन केले. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजुटीने प्रचारात सहभागी होतील आणि महायुतीच्या उमेदवाराचे काम करतील अशी ग्वाही शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिली.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रचारावेळी शिवसेना महिला आघाडीला देखील सामावून घ्यावे. लवकरच शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हयात अनेक ठिकाणी महिला मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या भागात ज्या पक्षाची ताकद आहे त्या भागात त्या पक्षाकडे संयोजन द्यावे. अशा सूचना शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत